खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांना एकत्रित करून त्यांचे समवेत संघटन मजबूती, जिल्हा/ तालुका समिती गठण कामी गाठी भेटी  देणार ;इंजि सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज
By; Ahmad Mulla 
म्हसवड
           संत नामदेव  समाज उन्नती परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इंजि सुनील पोरे यांनी जिल्हाभर दौरे काढून  शिंपी समाजाचे मेळावे घेऊन  समाजाच्या समस्या जाणून त्यांना एकत्रीत करण्याच्या अभियानाला सुरुवात केली पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शिंपी समाज मेळावे घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या समाजातील असणारे हेवेदावे समजून घेऊन चर्चेतून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला
  त्याच प्रकारे   पाटण तालुक्यातील मोरणा भागातील पेठशिवापूर येथे मंदिरातील कलशारोहण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना   कार्यक्रमाला  इंजि सुनील पोरे यांना खासआमंत्रित करण्यातआले होते यावेळी  श्री नीलकंठेश्वर महाराज धारेश्वर कोल्हापूर होऊन आलेले ब्राह्मण यांनी विधीपूर्वक धार्मिक कार्यक्रम केला   नामदेव महाराज श्री गणपती श्री हनुमान व विठ्ठल रुक्मिणी शंकराची पिंड नंदी कलश यांची स्थापना करून  ढोल ताशा व वारकरी सांप्रदाय टाळ मृदंग यांच्या गजरात  गावातून मिरवणूक    काढण्यात आली अनेक देणगीदार व बांधकाम करणारे  व श्री नीलकंठेश्वर महाराज धारेश्वर कोल्हापूर होऊन आलेले ब्राह्मण यांनी विधीपूर्वक धार्मिक कार्यक्रम केला त्याप्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले शिंपी समाजातील प्रतिष्ठित सातारा जिल्हा ना स प अध्यक्ष सुनील पोरे व त्यांच्या बरोबर आलेले सर्व समाजातील मान्यवर यांचाही सत्कार करण्यात आला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी समाजबांधवाशी चर्चा करतांना  इंजि.सुनील पोरे यांनी खंडाळा तालुक्यातील   भेटीबाबत  नियोजन केले ते खंडाळा तालुक्यातील खालील गावी समाज बांधव यांचे समवेत संघटन मजबूती, जिल्हा/ तालुका समिती गठण कामी गाठी भेटी  देणार आहेत शनिवार दि १८/२/२३ रोजी १)शिरवळ.दुपारी १.०वा   २) खंडाळा बावडा दु २.३०    ३) लोणंद ४.३० वा   ४) तरडगाव सायं. ६.वा  गावासमोर दिलेल्या वेळेत त्या गावात नामदेव शिंपी समाजाच्या बैठकांचे आयोजन केले आहे तरी सर्व    समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्चा सत्रांत सहभाग घ्यावा असे आवाहन इंजि. सुनील पोरे यांनी केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!