५५ वजन वयोगटात फायनल कुस्ती स्पर्धेत हर्षल उर्फ आरू हिंदुराव खांडेकर याने या वर्षा चा कुमार महाराष्ट्र कामगार केसरी किताब जिंकला
व्हिजन २४ तास न्युज
BY :Ahmad Mulla
म्हसवड :
५५ वजन वयोगटात फायनल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान अभिनंदन बोडके वर १०.० ने मात करत फायनल कुस्ती जिंकुन हर्षल खांडेकर याने कुमार महाराष्ट्र कामगार केसरी किताब पटकवला
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित आणि मुंबई शहर तालीम संघाच्या मान्यतेने लोअर परेल मुंबई येथे राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत १७० कुस्ती स्पर्धकांनी भाग घेतला होता या मधिल कुमार केसरी स्पर्धेत श्रीराम कुस्ती संकुल म्हसवड व माणदेशी चॅम्पियन चा पैलवान हर्षल उर्फ आरू हिंदुराव खांडेकर याने या वर्षा चा कुमार महाराष्ट्र कामगार केसरी किताब मिळवला
५५ वजन वयोगटात फायनल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान अभिनंदन बोडके वर १०.० ने मात करत फायनल कुस्ती जिंकुन हर्षल खांडेकर याने कुमार महाराष्ट्र कामगार केसरी किताब पटकवला
७ जानेवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय कामगार स्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२- २३ पारितोषिक समारंभाचे आयोजन केले होते या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते हर्षल खाडेकर यास चांदीची गदा आणी ५१ हजार रुपए रोख देऊन सत्कार करण्यात आला
हर्षल खांडेकर यास एन आय एस कुस्ती कोच महालींग खांडेकर, नवनाथ खांडेकर, नाना खांडेकर ,सुखदेव दिडवाघ, याचे मार्गदर्शन लाभले
हर्षल खांडेकर हा श्रीराम कुुस्ती संकुल म्हसवड येथे सराव करत होता तो आता माणदेशी चॅम्पीयन तर्फे दिल्ली येथे सराव करत आहे
हर्षल खांडेकर याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे चेतना सिन्हा, विजय सिन्हा, प्रभात सिन्हा, करण सिन्हा, अनिकेत आटपाडकर, मुंबई पोलीस अनीरूध्द आटपाडकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या