नामदेव समाज परिषदेच्या ११६व्या वर्धापन दिनानिमित्त म्हसवडमध्ये भव्य आरोग्य शिबीर इंजि.सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
              नामदेव समाजोन्नती परिषदेचा ११६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व  विविध उपक्रम राबवून साजरा करण्याचे आदेश नासप राज्याध्यक्ष संजीवजी तुपसाखरे यांनी दिले असून त्या अनुशंगाने सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा नासपचा ११६ वा वर्धापन दिन साजरा करण्याविषयी इंजिनियर सुनील पोरे यांनी आवाहन केले आहे 
       नासप सातारा  जिल्हा अध्यक्ष इंजि.सुनिल पोरे यांनी नामदेव शिंपी समाज म्हसवड व मे.शुभम भारत गॅस एजन्सी म्हसवड यांचे संयुक्त विद्यमाने म्हसवड शहरात भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे 
          सोमवार दि ३ एप्रिल रोजी म्हसवड येथिल नामदेव मंदिर कोष्टी गल्ली येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबीर चालू रहाणार असून यामध्ये सायटीका ,मायग्रेन ,टाचदुखी ,रोगप्रतीकारक शक्ती ,गुढघेदुखी,वात-संधिवात ,कॅल्शियम कमी ,हातापायांना मुंग्या येणे ,डोके दुखी,पाठदुखी,कंबरदुखी,कोणत्याही प्रकारची सुज यावर बोनसेटींग (कलरी मेथड) ने इलाज केला जाईल
                                या शिबीरासाठी नावनोंदनी आवश्यक आहे ती करण्यासाठी शुभम भारत गॅस एजन्सी 7888021111,अतुल फुटाने  8177937737,नामदेव चांडवले  9359725563, याचेकडे संपर्क साधावा असे आवाहन इंजि.सुनील पोरे यांनी केले आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!