बाजार समित्यांची २७ ला अंतिम प्रारूप यादी

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज म्हसवड

सांगली :

.

मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे बाजार समित्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. दीड वर्षे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून जिल्ह्यातील सांगली, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त केले होते.

एप्रिलपूर्वी त्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश न्यायालयाने पणन संचालकांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतदार यादी निश्चित करण्याचे सहकार प्राधिकरणकडून देण्यात आले आहेत.

राज्यात १ सप्टेंबर २०२२ नंतर ९ हजार ५२५ ग्रामपंचायती व ११३२ प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नव्या सदस्यांची निवड झालेली आहे. ते निवडून आलेले सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीस पात्र झाले असून, त्या पात्र सदस्यांचा समावेश होण्यासाठी मतदार याद्या सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करून अंतिम मतदारयादीत सुधारणा करण्याचा कालावधी १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत निश्चित केला आहे.

सुधारित प्रारूप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्या यादीवरील आक्षेप, हरकती २७ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. आक्षेपांवरील निर्णय ८ मार्च ते १७ मार्चपर्यंत घ्यावेत. तर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २० मार्चपर्यंत सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम असा

  • अंतिम मतदार यादीत सुधारणा कालावधी- १० ते २४ फेब्रुवारी
  • सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध- २७ फेब्रुवारी
  • मतदार यादीवरील हरकती- २७ फेब्रुवारी ते ८ मार्च
  • हरकतींवर सुनावणी व निर्णय -८ ते १७ मार्च
  • सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध – २० मार्च

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!