डोईफोडे कुटुंबियांच्या इच्छा पूर्ती निमित्त पळशीत हेलिकाफटरने पुष्पवृष्टि ; चिराग वयाचा अवघ्या 22 व्या वर्षी पायलट जिल्ह्यातील दूसरा पायलट

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
By:दौलत नाईक  प्रतिनिधी
 दहिवडी  :
            पळशी ता माण हे अधिकाऱ्यांचे गाव असा नावलौकीक आहे .पळशीतील जवळ पास ७५ क्लास वन अधिकारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात कार्यरत आहेत.असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात पळशी ची व्यक्ती नाही .एवीएशन ची कमतरता पण चिराग शशिकांत डोईफोडे यांनी भरून काडली आहे .नुकताच चिराग डोईफोडे कमरशीअल पायलट ( CPL ) झाला असून त्या इच्छा पूर्ती निमित्त त्याचे वडील  चित्रपट / निर्माते तसेच लोकप्रिय मालिका देवमाणूस मधील लाला डॉ.शशिकांत डोईफोडे व कुटुंबीय यांचे वतीने पळशी गावचे ग्राम दैवत श्री हनुमान मंदीर वर हेलीकाफटर ने पुष्प वृष्टि करण्यात येणार आहे .
      पायलट चिराग ची आई प्राथमिक शिक्षिका झेड पी शाळा पिंपरी ( माण ) येथे असून पायलट चिराग  चे प्राथमिक शिक्षन जिल्हा परिषद शाळा पळशी येथे झाले आहे .तसेच पुढील शिक्षण बारामती येथे पार पडले .DGCA अंतर्गत एवीएशन चा सर्व लेखी परीक्षा पास होवून कमरशिअल पायलट चे प्रशिक्षन दिल्ली , आसाम , बेंगलोर व बारामती येथून नुकतेच पुर्ण झाले आहे .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!