विभागस्तरीय युनिफाईट स्पर्धेत माण तालुक्याचा डंका
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
By: सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द :
दिनांक २७ मार्च रोजी झालेल्या जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आणि युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागीय शालेय
युनिफाईट स्पर्धा २०२३ मध्ये, चि. श्रेयस सुभाष शेडगे इयत्ता ७ वी, (गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द ता. माण जि. सातारा) आणि कु. प्रेरणा प्रमोद पोळ इयत्ता ९ वी ( जाशी माध्यमिक विद्यालय जाशी) हे स्पर्धक विजयी झाले आहेत. आणि राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
राज्य खेळाडू झाल्याबद्दल चिरंजीव श्रेयस आणि कु. प्रेरणा याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
यशस्वी खेळाडूंना गोंदवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कराटे मास्टर विजयकुमार अवघडे सर, श्री आदिनाथ शिंदे सर, गोपालकृष्ण विद्यालयाचे उपशिक्षक श्री विजय साळुंखे सर, व श्री सादिक शेख सर आणि जाशी विद्यालयाचे उपशिक्षक श्री. दडस सर , चि. अजिंक्य अवघडे, अनुष्का चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
चि. श्रेयस , त्याचे पालक श्री. सुभाष शेडगे , आणि कु. प्रेरणा , तिचे पालक श्री. प्रमोद पोळ यांचे मा. मुख्याध्यापक श्री टकले एम डी व सर्व सहकारी वृंद गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द आणि जाशी माध्यमिक विद्यालय जाशी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती , मा.सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत गोंदवले खुर्द, मुंबई विकास मंडळ मुंबई , सर्व अधिकारी वर्ग रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा, आजी माजी विद्यार्थी , समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.