प्राध्यापक राजेंद्र पाटील सर यांना आम. जयंत असगावकर यांचे हस्ते आदर्श शिक्षिक पुरस्कार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड /बिदाल :
नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनि कॉलेज बिदालचे “इंग्रजी विषयाचे शिक्षक प्राध्यापक मा.राजेंद्र पाटील सर यांना जिल्हा इग्लीश शिक्षक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षिक पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, प्रा. पाटील यानी कठोर परीश्रम करत गेली २७ वर्षे प्रामाणिक पणे इंग्लिश विषयावर अध्यापनाचे कार्य करीत समाजातील गरीब व होतकरू मुलांना चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिक्षण दिले तसेच इंग्लिश विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण केली बोलण्या व शिकल्यामुळे आपली तसेच आपल्या कुटुंबाची समाजाची कशी प्रगती होते या प्रकारची माहिती उदाहरणे त्यांना शिकविली आणि अशा व्यक्तीमत्वास आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला हि एक चांगली बाब आहे
हा पुरस्कार शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे सचिव प्राध्यापक अविनाश तळेकर, प्रा. दुर्गी, प्रा. संजय मोरे, प्रा चोर्लेकर प्रा.डोर्णे सर यांचे उपस्थितीत सात्कार करण्यात आला यावेळेस कोल्हापूर जिल्हा इग्लिश शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रा. राजेंद्र पाटील सर यांना पुरस्कार मिळाला ही बातमी समजताच ज्यू. कालेज वर व सरांच्या वर प्रेम करणा-या व सामाजीक चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकान्यांनी सरांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी बिदालचे लाडके सरपंच मा प्रमोद जगदाळे साहेब प्राचार्य सावंत सर, प्रा. पवार सर महात्मा गांधी ज्यू कॉलेजचे प्रा जाधव सर शिवाजी कॉलेज सातारा नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्यु.कॉलेजचे शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले