भारत देशातून नरेंद्र मोदी व भाजपा हद्दपार करून लोकशाही टिकवणे ही काळाची गरज :प्रकाश घाले
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सातारा .. प्रतिनिधी
भारत देशातून नरेंद्र मोदी व भाजपा हद्दपार करून लोकशाही टिकवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाश घाले यांनी केले आहे.
देशातील सध्य राजकीय परिस्थिती व राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रकाश घाले बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस पश्चिम उपाध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर ज्येष्ठ नेते सल्लागार संजय चौगुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते
.या निमित्त बोलताना घाले म्हणाले पंजाब शांत करण्यासाठी शहीद झालेल्या धर्मनिरपेक्ष भारताच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच श्रीलंका शांत करण्यासाठी भारताचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचे बलिदान भारतीय जनता कधीही विसरू शकत नाही. देशासाठी अनमोल त्याग केलेल्या त्याच गांधी घराण्यातील राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसून ‘पप्पू’म्हणून हिणवून गांधी घराण्याची बदनामी व चारित्र्यहनन केले नव्हते काय? केंद्रीय तपास यंत्रणा,तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून अधिकारांचा गैरवापर करत घाणेरड्या राजकारणाची सुरुवात केली. स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव यांनी सर्व धर्म समभाव या राज्यघटनेतील तत्त्वाचा आदर तर राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतभर फिरून “भारत जोडो” यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जातीय सलोखा व प्रेम निर्माण केले. रुजविला. तर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसून नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता वादाचे तत्त्व पायदळी तुडवून देशात जातीयवादाचे विष पसरविले व राज्यघटनेची वारंवार पायमल्ली करत कधी रामाचे नाव घेत कधी हिंदूंचे नाव घेत तर कधी सावरकरांचे नाव घेत जातीयवादाचे विष पेरुन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेवर घाव घालून सत्ताकारण केले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही का?
आज संपूर्ण देशातील राजकारण खालच्या स्थराला गेलेले दिसते. न्यायव्यवस्था केंद्रीय तपास यंत्रणा यावरील सरकारचा दबाव हा एक अत्यंत गंभीर व काळजीचा विषय बनला आहे. विरोधी पक्षाचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्याचा कटच रचला गेलेला दिसतो. गौतम अडाणी यांना 20 हजार कोटी रुपये एवढी मोठी रक्कम कोणी दिली या घोटाळ्या बद्दल राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवताना मांडलेल्या प्रश्नाची जर त्यांना हि सजा मिळत असेल तर सामान्य माणसाचे काय होईल?असा खडा सवाल जनतेतून विचारला जात आहे.एक कर्नाटक राज्यातील एका गावात घडलेल्या घटनेचा विपर्यास करत सुरत येथील न्यायालयातून निकाल दिला जातो, व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दोन वर्षे करावासाची शिक्षा ठोठावली जाते व 30 दिवसाची मुदत न्यायालयाने दिलेली असताना त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व अत्यंत घाईने रद्द केले जाते ही बाब भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे.
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचा लौकिक आहे.मात्र इथली लोकशाही पुर्णपणे धोक्यात आल्याचे चित्र आता लोकांच्या स्पष्टपणे लक्षात आल्यामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेमुळे संपूर्ण देश भावनिकदृष्ट्या गलबलून गेला असून राज्यघटनेच्या,न्यायव्यवस्थेच्या सार्वभौमत्वाविषयी व लोकशाहीच्या अस्तित्वाबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.संसदेमध्ये विरोधी पक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे.मात्र भारतीय जनता पक्ष हा कायद्याचा गैरवापर करत विरोधी पक्षाला संपवू पाहत आहेत. व लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीमध्ये करण्याचा घाट घातला जात आहे. गल्लीबोळातील सर्वच भाजपची नेते मंडळी दबंगगिरी व हुकूमशाही प्रवृत्तीने वागत असून हुकूमशाहीची लागण भाजपच्या गल्लीतील शेवटच्या पुढार्याला सुद्धा झाली आहे. गल्लीतला पुढारी सुद्धा ईडीची, पोलिसांची भीती सामान्यांना दाखवून त्याचा कार्य- भाग,स्वार्थ साधत आहे.हे चित्र खूप ओंगळवणे असून भारतीय जनतेला या गोष्टीचा आता उबग आलेला स्पष्ट दिसत आहे.या हुकूमशाही प्रवृत्ती बाबत भारतीय जनतेमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला असून ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या देशाला देश काँग्रेसमुक्त करा असे घाणेरडे आवाहन करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही. सभागृहात विरोधात बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून गप्प बसवणाऱ्या तसेच ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला भाग पाडून “खोक्यांचे” अमिश दाखवत, निवडणूक आयोगाला दबाव टाकून भ्रष्ट पद्धतीने सरकारे पाडून न्यायव्यवस्थेला धाब्यावर बसवू पाहणाऱ्या या हुकूमशाही प्रवृत्तींना आता लगाम घालण्याचे काम फक्त जनताच करेल.
राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावून तुरुंगात पाठवणे म्हणजे हा कहर असून भाजपाचा “आत्मघात” च आहे. याची किंमत भारतीय जनता पक्षाला लवकरच मोजावी लागेल. जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊन जनतेवर तसेच विरोधी पक्षातील आमदार खासदारांवर ईडी च्या माध्यमातून दबाव टाकणाऱ्या तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या वृत्तपत्र माध्यमांवर प्रचंड दबाव टाकत आपल्या सोयी प्रमाणे वाकवून -नमवून सत्ता टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान मोदी व त्यांचे बेदरकार आणि बेछुटपणे वागणाऱ्या अंधभक्त अनुयायांचे देशाची जनता आगामी निवडणुकीत रस्त्यावर ऊतरुन भर रस्त्यात वस्त्रहरण करून पळता भुई केल्याशिवाय राहणार नाही. देशाला काँग्रेसमुक्त करा म्हणणाऱ्या भाजपच्या सवंग,ऊथळ,दबंग,खोटारड्या नेतेमंडळीना
“मोदी मुक्त भारत” “भाजपा भगाओ“चा नारा देत सत्तेतून खाली खेचल्या शिवाय भारताची स्वाभिभानी जनता व शेतकरी शांत बसणार नाहीत असे प्रतिपादन भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी श्री.प्रकाश राव घाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर ज्येष्ठ नेते समन्वयक संजय चौगुले यांच्या सक्रिय कार्याबद्दल तसेच संघटन बांधणी बद्दल समाधान व्यक्त केले.