भाजप शासीत केंद्र सरकार च्या विरोधात माण काँग्रेसचे आंदोलन |
व्हिजन२४तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी भाजपने रद्द करीत त्यांच्यावर सुरु केलेल्या दडपशाहीच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्षाकडुन निदर्शने सुरु आहेत, केंद्रातील भाजपा शासनाने सुरु केलेल्या दडपशाहीचा निषेध म्हणुन माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडुनही तहसिल कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले.
माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडुन राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व केंद्र शासनाच्या विरोधात मंगळवार दि.28 रोजी दहिवडी येथे निषेध रँली काढण्यात येवुन तहसिलदार श्रीशैल्य वट्टे यांना निवेदन देण्यात आले.
महागाई,बेरोजगारी,खाजगीकरण, आदानी प्रकरणाची चौकशी व भ्रष्टाचार, शेतक-या बदलची चुकीची धोरणे व कायदे इ. जनसामान्याच्या समस्यांना वाचा फोडणारे व त्याबाबतचा केद्र सरकारला जाब विचारीत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मोदींच्या केंद्र सरकारची नाचक्की होत होती म्हणून राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची अत्यंत चुकीच्या पध्दतीने व अन्यायकारकरित्या कायदयाचा गैरवापर करीत खासदारकी रद्द करून दडपशाहीने राजकारण सुरू केले आहे यांच्या निषेधार्थ माण तालुका कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दहिवडी ता. माण येथील तहसील कार्यालय परीसरात मंगळवार दि.२८.०३.२०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. भाजप शासीत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला
केंद्र सरकार हे सध्या सुडाचे राजकारण करीत असुन त्यांनी घटना ही बासनात बांधुन ठेवली आहे, देशातील लोकशाही यामुळे धोक्यात आली असुन जो या विरोधात बोलतो त्याच्यावर लगेच कारवाई होत आहे त्याचे सदस्यत्व रद्द केले जात आहे, ही दडपशाही देशात सर्वत्र सुरु आहे. महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे यावर कोणीही बोलायला तयार नाही विरोधकांनी आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबला जात आहे अशीच परिस्थिती राहिली तर देशात लवकरच अराजकता माजेल असा आरोप यावेळी काँग्रेस च्या विविध पदाधिकार्यांकडुन करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, माण तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गब्बारभाई काझी, महीला अध्यक्षा नकुसाताई जाधव, संदिप जाधव, अँड. शिवाजी यादव, विष्णुपंत अवघडे, विश्वास जाधव, निलेश पोळ, प्रविण अवघडे, संदिप अवघडे आदीजण उपस्थित होते.