प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने पंचायत समिती माण यांना विविध मागण्यांचे निवेदन
व्हिजन२४तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड:
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने माण तालुक्यातील अपंगांच्या विविध मागण्यांचे निवेदन कक्ष अधिकारी मा.भास्कर गायकवाड “पंचायत समिती माण” यांना देण्यात आले, यावेळी अपंग क्रांती संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारी, उपाध्यक्ष लक्ष्मण हुलगे, सचिव बाळू कोळेकर, धामणी शाखा प्रमुख प्रशांत खाडे, चीरमे आधी अपंग बांधव उपस्थित होते.
मागण्या:-१) माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा ५ टक्के निधी वस्तू स्वरूपात न देता अपंग बंधू-भगिनींच्या थेट बँक खात्यामध्ये ३१ मार्च २०२३ अखेर जमा करावा तसेच पंचायत समितीचा अपंग कल्याण निधी खर्च करण्यात यावा. २) तालुक्यातील शक्य आहे त्या ग्रामपंचायत मध्ये अपंग बंधुभगिणीसाठी ‘अपंग कक्ष’ मिळावा. ३) तालुक्यातील अपंग बंधू भगिनींच्या कुटुंबाना व विधवा महिलांना विनाअट प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये प्राधान्याने घरकुल मिळावे. ४) या घटकातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यास त्यांना आपल्या ग्रामपंचायत गावठाणातील मोफत जागा द्यावी किंवा जागा खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान द्यावे. गरीब अपंग बांधवांसाठी घरपट्टी भरण्याचा अट्टाहास न करता त्यांना सर्व शासकीय योजनांच्या लाभ देऊन सहकार्य करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.