वाई पोलीस ठाणे जि. सातारा यांची दबंग कारवाई. घरफोडी करणारा आरोपी ६ तासात अटकेत व १लाख,७५,हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला  )
By:सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द :प्रतिनिधी
                          दिनांक १९/०३/२०२ रोजी रात्रौ १०.०० ते दिनांक २१/०३/२०२३ रोजी ०८.०० वाजण्याच्या दरम्यान सटालेवाडी ता. वाई जि. सातारा गावातील सौ. विद्या दिपक जाधव रा.सटालेवाडी ता. वाई याची सासु बाबर हॉस्पीटल, वाई येथे उपचारा करीता अॅडमीट असताना त्याच्या रहाते बंद घरात कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करुन त्याचे कपाटातील कि.रु.१,७५,०००/- चे सोन्याचे दागिणे त्यामध्ये नेकलेस, कर्णफुले व वेडणे चोरीस गेले असले बाबत तक्रार दिल्याने गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आलेला होता.
          सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांना सदर
अज्ञात आरोपीचा शोध घेवून पकडने बाबत आदेश दिलेले होते. त्यानूसार श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे घटना घडले पासून वाई शहरात पेट्रोलिंग करुन व बातमीदारांचे भेटी घेवून आरोपींचा शोध घेत होते, परंतू आरोपींची माहीती मिळत नव्हती.
              दरम्यान श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पो.स्टे. यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी फिर्यादीच्या घरातीलच व्यक्तिने केलेली आहे. त्यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी बातमीच्या अनूशंगाने तपास करणे बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी सटालेवाडी व वाई शहरात संशयीत आरोपीचा शोध घेत असताना एस. टी. स्टॅण्ड वाई समोर एक संशयीत फिरत असताना दिसला त्याला आमची चाहूल लागताच तो पळून जात असताना त्यास पाठलाग करुन पकडले आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशात सदर गुन्हयात चोरीस गेलेले कि.रु.१लाख ७५ हजार चे सोन्याचे दागिणे त्यामध्ये नेकलेस, कर्णफुले व वेडण मिळून आले आहेत.सदरचा आरोपी हा फिर्यादी यांचा मुलगा असून त्याचे विरुध्द यापुर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
            सदरची कारवाई श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे – खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे-खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!