दहिवडी नगरपंचायतीचा थकीत कर भरा अन जप्ती टाळा – मुख्याधिकारी अवधूत कुंभार. कर भरण्याचे आवाहन, भरणा करण्यासाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुरु

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हस वड
By:दौलत नाईक* 
दहिवडी/प्रतिनिधी:
          दहिवडी नगरपंचायत कराच्या माध्यमातून नागरिकांना विविध नागरी सोय– सुविधा पुरवित आहे मात्र दहिवडी शहराची कर वसुली ४०% हून कमी आहे.  तरी नगरपंचायतीची घरपट्टी, पाणी पट्टी व थकीत कर भरून सहकार्य करावे. अन्यथा धडक मोहीम राबवून  कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिला आहे.  
                 माहिती देताना मुख्याधिकारी अवधूत कुंभार म्हणाले की, कर वसुलीच्या टक्केवारी वर शासनाकडून येणारे अनुदान अवलंबून असते. ही वसुली थंडावली तर शासनाच्या माध्यमातून येणारे अनुदान बंद पडत असते. परिणामी नागरिकांना सुविधा देताना आम्हाला सुद्धा अडथळे निर्माण होतात. पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी नगरपंचायतीच्या फंडातून दोन कोटी अडोतीस लाख रुपयांचा भरणा करणे गरजेचे आहे. अन्यथा सदरची पन्नास कोटींची पाणीपुरवठा योजना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
                           तरी दहिवडीच्या सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्याकडील कर तातडीने भरून नगरपंचायतीला सहकार्य करण्यात यावे. तसेच कर वसुलीच्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाला धडक कारवाईची मोहीम राबवून  करून कटू पावले उचलावी लागतील. यामध्ये २% दरमहा दराने व्याजदंड आकारणी करणे, नळ कनेक्शन तोडणे, वीज वितरण कंपनीच्यामार्फत वीज पुरवठा खंडित करणे, प्रॉप्रटीची जप्ती व लिलाव करून वसुली करण्यात येईल. असा इशारा नगरपंचायतीच्यावतीने मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिला आहे.
 चौकट: थकीत कर भरणा करण्यासाठी नगरपंचायत कार्यालय सुट्टीच्या कालावधी सह सकाळी  आठ वाजले पासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होईल.  तसेच कर तातडीने जमा करून घेण्यात येईल, तरी या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्या

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!