स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडाकेबाज कारवाई.* गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकुन १६ लाख,६३ हजार, ८०० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
व्हिजन२४ तास न्यूज
BY ; सादिक शेख
गोंदवले खुर्द ; पोलीस टाइम रिपोर्टर:
श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना गुटखा विक्रेत्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
दि. १५/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोन इसम इनोव्हा कार क्रमांक एम.एच.०९ बी.बी. ६६९६ मधून पुणे येथे महाराष्ट्र राज्यात विक्री करीता प्रतिबंधीत असलेला गुटखा घेवून जात आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास नमुद वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे नमुद पथकाने वाढे फाटा परिसरामध्ये सापळा लावला. ११.३० वा. चे. सुमारास प्राप्त माहितीमधील इनोव्हा कार क्र. एम. एच. ०९ बी. बी. ६६९६ आल्याने थांबवून त्यामधील दोन ) अर्जुन कुमार चव्हाण वय 21 रा रुई ता हातकणंगले जि कोल्हापूर 2) विशाल अजित हुल्ले वय 22 रा रुई ता हातकणंगले जि कोल्हापूर याचेकडे विचारपूस केली असता त्यांनी इनोव्हा कार मध्ये विमल गुटखा असल्याचे सांगीतल्याने विमल पानमसाला व व्ही. – १ टोबॅको (तंबाखू) असा ६,६३,८०० /- रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा व १०,००,०००/- रुपये किमतीचे वाहन असा एकूण १६,६३,८०० /- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. इम्रान हवालदार यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होवून ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत सातारा तालूका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची तजविज चालू आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला,लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मोहन पवार, प्रविण कांबळे,गणेश कापरे, अजय जाधव, निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा
व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.