अनिल देसाई यांची माय्याका मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाखाची मदत
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यातील वरकुटे – मलवडी येथील श्री माय्याका मंदीराच्या सुरू असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामास सातारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई व देसाई उद्योग समूहाकडून एक लाखांची देणगी जिर्णोद्धार समितीकडे प्रदान करण्यात आली आहे. यावेळी अनिल भाऊ देसाई म्हणाले लोक सहभागातून सुरू असलेल्या माय्याका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी लागेल ती मदत देसाई कुंटुंबाच्या वतीने केली जाईल . मंदीराचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे यासाठी नागरिकांनी मदत करावी असे ही आवाहन अनिल भाऊ देसाई यांनी केले आहे.
यावेळी युवा उद्योजक महेंद्र देसाई , माजी सरपंच जालिंदर खरात , माजी सरपंच भारत अनुसे , दरगोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष हरिबा मिसाळ , ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे , माजी अध्यक्ष बाबुराव मिसाळ , संपादक बापूसाहेब मिसाळ , अनिकेत आटपाडकर , माजी चेअरमन कांतीलाल खांडेकर , दिलीप वाघमोडे , पांडुरंग मिसाळ , रामचंद्र मिसाळ , रघुनाथ मिसाळ , आण्णा मिसाळ , अमर मिसाळ , विठ्ठल मिसाळ , सुखदेव मिसाळ , कोंडीबा मिसाळ , दादा पडळकर , दत्ता मिसाळ आदीजण उपस्थित होते.