समाजहित पाहुन निर्णय न घेतल्यास नगरपालिकेविरोधात आत्मदहन करणार – प्रमोद लोखंडे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड 
By : अहमद मुल्ला 
म्हसवड 
            म्हसवड नगरपरिषदेने विकासकामाच्या नावाखाली येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन समोर नवीन वाचनालय इमारत बांधण्याचा घाट घातला असुन ज्या ठिकाणी ही नवीन वास्तु उभारली जाणार आहे त्याठिकाणी ती न उभारता सांस्कृतिक भवनाच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या मोकळ्या जागेत करावे अशी येथील  नागरीकांची मागणी असताना देखील पालिकेने नागरीकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत नियोजित जागीच खोदकाम सुरु केले आहे, हे खोदकाम अन्यायी असल्याचा आरोप करीत पालिकेने ते काम त्वरीत थांबवुन नागरीकांनी पुर्वी लेखी मागणी केलेल्या जागेतच वाचनालय उभारावे अन्यथा पालिका विरोधात आपण आत्मदहन करू असा लेखी इशारा दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे यांनी दिला आहे.
          याबाबत लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की म्हसवड पालिकेने मल्हार नगर येथे वाचनालय इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला आहे, पालिकेचा हा निर्णय आमच्यासाठी गौरवास्पद आहे, मात्र पालिका ज्याठिकाणी सदरची इमारत उभारणार आहे त्या जागेला येथील रहिवाशांचा विरोध आहे याबाबत आपण यापुर्वीच पालिकेला लेखी कळवले आहे, मात्र पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष करीत नियोजित ठिकाणीच सदरची इमारत उभी करण्याचा घाट घालत संबधित ठिकाणी खोदकाम सुरु केले आहे. वास्तविक येथील नागरीकांच्या
 म्हणण्यानुसार सदर ची इमारत नियोजित ठिकाणी उभी राहिल्यास येथील सांस्कृतिक भवन हे पुर्णपणे झाकळले जाणार आहे, तर या नूतन इमारतीमुळे सांस्कृतिक भवनात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास अडथळा येणार आहे, याऊलट सदरचे वाचनालय हे सांस्कृतिक भवनाच्या पश्चिम बाजुस केल्यास येथील जागेचा पुरेपुर वापर होणार आहे त्यामुळे पालिकेने येथील खोदकाम थांबवुन ते पश्चिम दिशेला असणाऱ्या मोकळ्या जागेत करावे अन्यथा आपण पालिका विरोधात पालिका इमारतीसमोर आत्मदहन करू असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!