गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द विद्यालयात निर्भया पथकाचे मार्गदर्शन
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
BY; सादिक शेख पोलीस टाईम रिपोर्टर
गोंदवले खुर्द ;
. समीर शेख पोलिस अधिक्षक सातारा, बापू बांगर अपर पोलिस अधिक्षक सातारा , गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव सौ.अनिता आमंदे मेनकर मॅडम सहाय्यक पोलिस निरीक्षक निर्भया पथक प्रमुख सातारा . अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली टी. जी. चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल २३७९ दहिवडी पोलीस ठाणे सौ.घाडगे एस. आर. मॅडम यांनी रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द तालुका माण जिल्हा सातारा विद्यालयात निर्भया पथक उपक्रम टोल फ्री नंबर १०९८, ११२मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना दळणवळण उद्बोधन, ट्राफिक शिस्त, बालकांचे गैरवर्तन, पिळवणूक, लैंगिक छळ, शारीरिक गैरवर्तन, मादक पदार्थ सेवन, चांगला व वाईट स्पर्श, भावनिक सुरक्षा, मानसिक सुरक्षा, ताणताणाव व्यवस्थापन विद्यार्थी समुपदेशन, शारिरीक संरक्षण, वैयक्तिक सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले.
निर्भया पथक क्र. ५ हे गेली बरीच वर्षापासून सर्व विद्यालये महाविद्यालये मध्ये जाऊन मार्गदर्शन करून विद्यार्थी जागृतीचे मोलाचे सहकार्य करीत आहे. या पथकातील सदस्यांची कामगिरी ही अत्यंत चांगली आहे. त्यामुळे विद्यालयातील, महाविद्यालयातील मुला मुलींवर शिस्तीचे चांगले संस्कार होत आहेत. निर्भया पथकामार्फत करत असलेले काम खरेच कौतुकास्पद आहे त्याबद्दल सर्व अधिकारी यांना विद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद दिले.
या प्रसंगी विद्यालयातील मा. मुख्याध्यापक टकले एम. डी. आर.एस. पी. तालुका समादेशक सादिक शेख , .अशोक उगलमोगले, दिनेश जाधव, .गोपीनाथ घोडके, . प्रमोद माने, विजय साळुंखे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. प्रदीप घाटगे, श्रीमती कलावती अवघडे उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. समीर शेख पोलिस अधिक्षक सातारा, मा. बापू बांगर अपर पोलिस अधिक्षक सातारा,. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव .सौ.अनिता आमंदे मेनकर मॅडम सहाय्यक पोलिस निरीक्षक निर्भया पथक प्रमुख सातारा अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी, यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक क्र. ५ मधील मा. श्री. टी. जी. चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल, सौ.घाडगे एस. आर. यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले त्या बद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व अधिकारी वृंद मार्गदर्शक यांचे विद्यालयाचे . मुख्याध्यापक टकले एम. डी. यांनी आभार! मानले.