चारा छावणी चालक व मालकांचे थकीत अनुदान तातडीने द्यावे : महादेव जानकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
व्हिजन २४ तास न्युज
By:अहमद मुल्ला
म्हसवड :
माण खटाव तालुक्यात चारा छावणी चालकांचे चार छावणी मालकांचे जे उर्वरित थकीत अनुदान जे प्रलंबित आहे ते तातडीने देण्याची मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे + केली आहे..
एप्रिल ते माहे. ऑगस्ट २०१९ मधील प्रलंबित देवकाच्या अनुषंगाने शासनाने महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र. एमसीवाय
२०१९ प्र.क्र. ३०/म-७ दि. ४ मे २०१९ मध्ये नमूद केलेल्या पद्धतीनुसार चारा छावणीमधील जनावरांची नोंदणी शासन निर्णयानुसार कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीमध्ये चारा छावणीतील पशुधनाची नोंदणी व पशुधनाची दैनंदिन नोंद घेण्याबाबतची दि. १५.५.२०१९ पर्यंत पूर्ण करण्याबाबत शासनाने निर्देश देण्यात आले होते.
तसेच शासन निर्णय क्र एमसीवाय केली आहे. २०१९ के ३०/म-७ दिनांक १६ से २०१९ अन्वये कंटल कैम्प मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरु करणेबाबत दिनांक १५ मे २०१९ पासून १ आठवडयाची मुदत वाढ देणेत आली होती. परंतु सदर शासननिर्णयामध्ये सदर प्रणालीमध्ये जनावरांची व मालकाची हजेरी दररोज न घेता आठवडयातून एकदा घेणेबाबत निर्देश देणेत आलेले होते. त्यानुसार आठवडयातून छावणीतील पशुधनाच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
तरी सदर चार छावणी मालकांचे जे उर्वरित थकीत अनुदान एप्रिल ते माहे ऑगस्ट २०१९ मधील जे प्रलंबित आहे ते तातडीने त्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी महादेव जानकर यांनी केली