देशाचा मालक असलेल्या प्रत्येक भारतीयाला पेन्शन द्या .* *सादिक खाटीक यांची मागणी .*
व्हिजन २४ तास न्युज( संपादक:अहमद मुल्ला )
By:सादिक खाटिक
आटपाडी (प्रतिनिधी ):
देशाचा मालक असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला देशातल्या लाखो करोडोंच्या व्यवस्थेतल्या नफ्यावरचा लाभांश – ( डीव्हीडंट ) रूपाने पेन्शन देणे हेच खरे न्यायाचे आहे . असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी आटपाडी तहसील कार्यालया समोर आंदोलनास बसलेल्या शासकीय कर्मचारी – अधिकारी – शिक्षक बंधू भगिनींच्या आंदोलनास पाठींबा देताना सादिक खाटीक बोलत होते . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील तालुका हणमंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनास पाठींबा दिला . जुनी पेन्शन मिळेपर्यत तुमचे पाठीराखे असू असे अभिवचन त्यांनी दिले . आताच्या सरकारने प्रश्न सोडविला नाही तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच हा प्रश्न निकाली काढेल अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी दिली .
यावेळी असिफ मुजावर, यु टी जाधव, शरद चव्हाण, जगन्नाथ कोळपे, नितीन गळवे, दीपक कबीर, मेहेरअली कलाल, प्रवीण बाड, यशवंत गोडसे इत्यादी अनेक मान्यवर आंदोलनकर्ते तसेच राष्ट्रवादीचे नेते विष्णुपंत चव्हाण, सुरज पाटील, अतुल पाटील, रणजीत चव्हाण, विलासराव नांगरे – पाटील प्रभाकर नांगरे – पाटील, दत्ता यमगर , प्रा संताजी देशमुख सौ .अर्चना जगताप , मुन्ना मुलाणी ,साहेबराव कदम इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
निवृतीच्या वयानंतरचा प्रत्येक भारतीय नागरीक सुरक्षित, आरोग्य संपन्न, आणि स्वस्थ असला पाहीजे, ही जबाबदारी सरकारने स्विकारली पाहीजे . करोडो – अरबो उद्योग व्यवसाय – व्यवस्थामधून कोटयावधी खरबोंची उलाढाल होत असते . देशाचा विश्वस्त – मालक – राजा असणारा प्रत्येक भारतीय या प्रत्येक व्यवस्थेचा अप्रत्यक्ष मालकच आहे . या देशभरातल्या होणाऱ्या करोडो खरबोंच्या उलाढालीच्या नफ्यातून काही टक्के लाभांश – डीव्हीडंट प्रत्येक भारतीयाला मिळणे हक्काचे न्यायाचे आहे . आणि वृद्धापकाळी आधार ठरण्यासाठी प्रत्येक भारतीयाला डीव्हीडंट रुपातला पैसा पेन्शनच्या रुपाने दिला जाणे योग्य होणार आहे . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यासह सर्वांनाच पेन्शन योजना सुरु करून मध्यवर्ती शासनाने, प्रत्येक भारतीयाला ते मालक असल्याचा प्रत्यय द्यावा . लाखो कोटींची कर्जे घेवून फुर्र झालेल्या भगोड्या उद्योगपती कडून त्यांच्याकडील थकीत पैसा वसूल केला जावाच . तथापि अनैतिक मार्गाने प्रचंड पैसा मिळविणार्यांची सर्व संपत्ती जप्त करीत राष्ट्राची संपत्ती घोषीत करून ती ताब्यात घ्यावी . भ्रष्टाचाराला पायबंद घालणारे प्रचंड निर्बध देशभर लादावेत . सामान्यांच्या विकासाच्या वापरात न येणारा आणि शासनाला ही तो घेता न येणारा, सर्वच धर्मियांच्या धार्मिक स्थळांमधून जमणारा सर्वसामान्यांचा भारतीय बजेटच्या १८ पट पैसा शासनाने ताब्यात घेऊन प्रती वर्षी १८ पटीने भारताचा विकास साधावा . नवनवीन उद्योग व्यवसाय व्यवस्थांमधून उत्पन्न मिळविणारी नवी व्यवस्था साकारत देश जगात अव्वल ठरवावा . प्रगत राष्ट्रात वयोवृद्धांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती राष्ट्रीय विश्वस्त असलेल्या प्रत्येक भारतीयांना द्याव्यात . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी म्हंटले आहे .