राज्यव्यापी संपाची तिव्रता वाढली म्हसवड मध्ये उद्या सर्व राज्यशासकीय कर्मचाऱ्यांची भव्य पेन्शन पदयात्रा चे आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By:अहमद मुल्ला
म्हसवड:
म्हसवड शहर व परिसरातील सर्व कर्मचारी बांधवांनी जुन्या पेन्शन सह शासनाने सक्तीने लागू केलेल्या विविध जाचक धोरणाविरुद्ध व भविष्यात येऊ घातलेल्या खाजगीकरण व कंत्राटीकरण या शासनाच्या धोरणाच्या विरोधात व इतर विविध मागण्यासाठी पुकारलेल्या संपाच्या निमित्ताने भव्य पेन्शन पदयात्रा चे आयोजन केले आहे.
शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक ८.00 वाजता चांदणी चौक-प्राथ. आरोग्य केंद्र-छ. शिवाजी महाराज चौक-महात्मा फुले चौक-चांदणी चौक या मार्गांवरून भव्य पेन्शन पदयात्रा चे आयोजन केले आहे तरी तालुक्यातील समन्वय समितीच्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी , सर्व पेन्शन फायटर,संपात सहभागी सर्व शिक्षक , ग्रामसेवक , तलाठी , कृषिसेवक , आरोग्य , पशुसंवर्धन , बांधकाम , पाणीपुरवठा , महिला बालकल्याण , पंचायत समिती , महसूल विभाग , शासकीय ITI, वनविभाग, व इतर बंधू भगिनी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी म्हसवड येथे सर्वांनी उपस्थित रहावे , असेआवाहन माण तालुका समन्वय समिती (म्हसवड विभाग) यांनी केले आहे
एकच मिशन जुनी पेन्शन
जुनी पेन्शनची मागणी का?
* २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या बांधवास सेवेत असताना मृत्यू पावल्यास कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नसून त्याच्या कुटुंबास कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही मग आशा वेळेस त्या कुटूंबातील इतर सदस्यानी काय करावे? नोकरीत असताना मुलांचे शिक्षण ,आरोग्य व कौटुंबिक खर्च पाहता निवृत्ती नंतर त्याला उर्वरित आयुष्यात आर्थिक नियोजनासाठी पेन्शनची गरज आहे*
* शासकीय कर्मचारी म्हणजे कुणीही शेठजीच्या पोटचा नसतो….. आपल्या अभ्यासावर भरती झालेला शेतकऱ्याचा पोरगा असतो
त्याला आयुष्यभर नोकरी सोडून दुसरं काहीही करायला बंदी असते…. त्यामुळे भविष्याची तरतूद म्हणून तो पेन्शन मागतो….
* आज गलेलठ्ठ पगार…. लाखांनी पगार…. असे भरपूर मेसेज पहायला मिळतात…. मात्र मिळणाऱ्या पगारापैकी २४% पगार नवीन पेन्शन योजनेत जमा होतो…. आणि या २४% सह तो मिळणाऱ्या पगाराच्या २० ते ३०% इन्कम टॅक्स भरतो…* म्हणजेच एकूण ५४% पुन्हा शासनाच्या हवाली करतो…. आणि उर्वरित ४६% पगारावर कुटुंब चालवतो
* आज आम्हीही 50% पगारावरच काम करतोय….. त्यात उद्या खाजगीकरण झालेच नाही तर तुमचेही स्वागतच आहे….. मात्र आमच्यासह तुमचेही भवितव्य सुकर व्हावे… यासाठीच हे मोर्चे… आंदोलने