दहिवडीत किराणा मालाचे दुकान फोडून पावणेपाच लाखाचा माल लंपास चोरीने घटनेने दोशी कुटुंबावर संकट , परीसरातील व्यावसायिक भयभीत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला)
 By;दौलत नाईक                                                                                                                                                                                 दहिवडी/प्रतिनिधी :
                  दहिवडी- गोंदवले बुद्रुक रस्त्यालगतच्या अरिहंत किराणा मालाच्या दुकानाचे पत्रे कापून सुमारे पावणेपाच लाखांचा माल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास  दहिवडीत घडली.मोठ्या शिताफीने केलेल्या या चोरी दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी ही यंत्रणाच चोरट्यांनी चोरून नेली आहेया चोरीची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 
        याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,मयूर,स्वागत व वैभव दोशी भाव-भावांचे दहिवडीतील एकता नगर परिसरात गोंदवले रस्त्यालगत अरिहंत किराणा स्टोअर्स  नावाचे दुकान आहे.किराणा मालाची किरकोळ व होलसेल विक्री या दुकानातून केली जाते.काल  रात्री खाद्यतेलाच्या डब्यांचा सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचा माल दुकानात उतरवून घेऊन दोशी बंधू घरी गेले.त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास ही मोठी  चोरी करण्यात आली आहे.
         चोरट्यानी दुकानाच्या मागील बाजूच्या पत्र्याची पाने कटरने कापली.याशिवाय शेजारच्या स्टील दुकानाच्या कंपाउंडचे पत्रेही दोन ठिकाणी कापून दुकानात प्रवेश केला आहे. चोरीसाठी छुपा मार्ग करून दुकानातील माल आडोशाला उभ्या केलेल्या वाहनातून चोरून नेला असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. खाद्यतेलासह काजू,बदाम,खोबरे,शेंगदाणे,तांदूळ असा सुमारे पावणेपाच लाखाचा माल चोरट्यानी लंपास केला. ही अगदी नियोजनबद्ध चोरी करताना चोरट्यानी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद केले.अन्य साहित्याबरोबर सीसीटीव्ही कमेराची यंत्रणाही चोरून नेली आहे.मात्र तत्पूर्वीच यातील स्वयंचलित कमेऱ्यातुन एका चोरट्याचे छायाचित्र दोशी यांच्या मोबाईलमध्ये प्रसारित झाले होते.
            चोरट्यानी दुकान फोडल्याची बातमी सकाळी समजल्यावर मालकांनी घटनास्थळी धाव घेतली. दहिवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही लगेच तपासाच्या दिशेने सूत्र  हलवली.दुपारी ठसेतज्ञ व श्वान पथकानेही कसून पाहणी केली.श्वानाने दुकानाच्या मागील बाजूने मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग काढला.मात्र श्वान तिथेच घुटमळले असल्याने पुढे माग निघण्याचा मार्ग धूसर झाला.या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!