५० वर्षा पूर्वीपासून शासकीय जागेवर असलेली अतिक्रमण काढण्यास मुख्याधिकारी सचिन माने यांना यश
व्हिजन२४तास न्यूज
BY ;Ahmad Mulla
म्हसवड प्रतिनिधी –
येथील सातारा सोलापूर रस्त्यालगत अर्ध शतकाहून अधिक काळ शासकीय जागेवर अतिक्रमण करुन व्यवसायिकांनी दुकाने घरे बांधकाम करुन अतिक्रमण केले होते.न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका पोलिस खाते व प्रशासनातील इतर विभागांनी अतिक्रमण हटाव मोहिम संयुक्तपणे राबवत अतिक्रमणे काढण्यात आली.
म्हसवड येथील बसस्थानक चौकापासून पुढे पूर्व कडील बाजूला शासकीय जमिनीवर गत आर्ध शतकाहूनअधिक काळ अतिक्रमण करुन रहिवासी घरे, विविध व्यवसायाची दुकाने होती यासाठी अतिक्रमण धारक व प्रशासनात सुमारे पंचवीस वर्षे न्यायालयीन लढा सुरु होता तो निर्णय प्रशासनाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हि अतिक्रमण हटाव मोहिम मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. अतिक्रमणे काढण्यास पंढरपूर नाक्यावरून सुरुवात करण्यात आली ती बसस्थानकापर्यत अतिक्रमण केलेली अतिक्रमीत दुकाने काढण्यात आली. यावेळी काहीजणांनी स्वता:हून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता अतिक्रमण मोहीम यशस्वी पार पडली.
या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, तहसिलदार श्रीशैल व्हट्टे, म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने, सपोनि राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, मंडलाधिकारी युएन परदेशी, तलाठी उत्तम आकडमल, यांचेसह म्हसवड नगरपालिका पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, बांधकाम विभाग, विज वितरण,भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्तपणे सहभागी होत अतिक्रमण मोहिम यशस्वी केली.