दहिवडीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद धरणे आंदोलन सुरु
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By:दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
दहिवडी ता. माण येथील नगरपंचायतीमधील महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नगरपंचायतीसमोर कामबंद धरणे आंदोलन सुरु केले आहे. नगरपंचायतीमधील कर्मचार्यांचे सरसकट समावेशान करण्यात यावे, कर्मचाऱ्यांचे पगार ट्रेझरी मधून करण्यात यावेत,२००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही,ती योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.
या आंदोलनात पुणे विभागीय उपाध्यक्ष देवा देवकुळे, सातारा जिल्हा सहसचिव अजय आवटे, उपाध्यक्ष राजेंद्र हिंगळकर, श्रीकांत पिसाळ,सचिव अमोल आवटे, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण, जेष्ठ कर्मचारी चंद्रकांत साठे मामा, पांडुरंग शेळके, संदीप आवटे, जयसिंग अवघडे, रवींद्र मदने,हरिबा हगरे, लक्ष्मी रणपिसे, माया खरात, आनंदा नाळे, आनंदा देवकुळे, रोहिदास चव्हाण आदी सहभागी झाले आहेत.