माणदेशाच्या नवोदित कवियत्री कु.सोनाली माने यांना काव्यगौरव पुरस्कार प्रदान
व्हिजन २४ तास न्यूज
By ; अहमद मुल्ला
म्हसवड
महाराष्ट्रातील साहित्यिकांना प्रेरणा देऊन नवसंजीवनी मिळावी म्हणून कोल्हापूर येथील भारतीय कोल्हापूर मंच यांच्या तर्फे वासुदेव मंगल कार्यालय नृसिंहवाडी येथे पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . या कवी संमेलनाला निमंत्रित कवी रसिक श्रोते उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्रातील किर्तीवंत कवींना काव्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
माण तालुक्यातील बिदाल गावच्या सुकन्या , ऑल इंडिया मातंग सेनेच्या प्रसिद्ध प्रमुख , माण चौफेर न्युज चनेलच्या उपसंपादिका व नवोदित कवियत्री कु सोनाली एकनाथ माने यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संमेलनाध्यक्ष प्रा.कल्याण राऊत , जेष्ठ साहित्यीक प्रा.शरदचंद्र काकडे व जेष्ठ साहित्यीक सौ.रोहिणी पराडकर यांच्या हस्ते काव्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पहिल्या कवी संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक श्री. दिंगबर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गिरीश भट , सौ. ऋचा महाबळ , सौ. वर्षा भट , जेष्ठ फोटोग्राफर अमोल पराडकर , अवधूत पुजारी , प्रशांत आडे , माण चौफेरचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवी संमेलनाचे औचित्य साधून कल्याण राऊत यांच्या श्वास माझे तुझ्यासाठी, सं. रोहिणी पराडकर यांच्या किलबिलाट या बाल कविता संग्रहाचे या शिवाय ऋचा महाबळ यांच्या समर्पिता या कविता संग्रहाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. कवी संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित पाहुण्यांनी कवी व कवयित्रींना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काव्य संमेलनास कोल्हापूर, मुंबई, पुणे, लातूर , औरंगाबाद , बंगळुरू, सांगली सातारा, बारामती येथून सारस्वतांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या काव्य संमेलनाचे आयोजन भारतीय कोल्हापूर मंचच्या प्रमुख सौ. रोहिणी पराडकर व अमोल पराडकर यांनी केले होते.
कार्यक्रमस्थळी पुनम सावंत व सिमंतीनी हर्डीकर यांनी सुंदर व सुरेख रांगोळी काढून यावेळी उपस्थित मंडळींचे लक्ष वेधले. प्रारंभी दीप प्रज्वलन व स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसागर गुरव, व सौ. साधना घाटगे यांनी केले तर जयश्री पवार यांनी आभार मानले.
कु. सोनाली माने यांना काव्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माण तालुका डिजीटल मिडीयाच्या सर्व सदस्यांनी , ऑल इंडिया मातंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष पी.जी.माने , सचिव ओंकार माने , अंकुश अवघडे , प्रविण अवघडे , कु. ज्योती माने , सौ. गौरी महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या.