रहदारीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी गाडा लावल्याने दोघांवर गुन्हा : म्हसवड पोलिसांची कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज
By : Ahmad Mulla
म्हसवड
         लोकांच्या जीवितास धोका व रहदारीस अडथळा व वित्तहानी होईल अशा प्रकारे हात गाडे उभे केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी मौजे म्हसवड गावचे हद्दीत एस टी स्टॅण्ड समोरील सार्वजनिक रोडवर पान सेंटर गाडा विठू दिलीप गोंजारी वय ४२ वर्षे रा. म्हसवड ता. माण जि. सातारा यांने आपले गुरुकृपा वडापाव गाडा हा लोकांच्या जीवितास धोका व रहदारीस अडथळा व वित्तहानी होईल अशा प्रकारे उभे केले स्थितीत मिळून आला म्हनून माझी त्याचे विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम २८३ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरची फिर्याद संतोष पांडुरंग बागल वय ४२ वर्षे धंदा नोकरी पोकाँ ब नं २४६४ नेमणूक म्हसवड पोलीस ठाणे यांनी दाखल केली आहे.
दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हसवड गावचे हद्दीत एस टी स्टॅण्ड समोरील सार्वजनिक रोडवर पान सेंटर गाडा सतीश शिवलिंग गोंजारी वय ५८ वर्षे रा. म्हसवड ता. मान जि. सातारा यांने आपले पान सेंटर गाडा हा लोकांच्या जीवितास धोका व रहदारीस अडथळा व वित्तहानी होईल अशा प्रकारे उभे केले स्थितीत मिळून आला म्हनून माझी त्याचे विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम २८३ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरची फिर्याद संतोष पांडुरंग बागल वय ४२ वर्षे धंदा नोकरी पोकाँ ब नं २४६४ नेमणूक म्हसवड पोलीस ठाणे यांनी दाखल केली असून अधिक तपास पो हवालदार एस. एस. जाधव हे करीत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!