लोधावडे येथे दोन कारची भिषण धडक एक जखमी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By; अहमद मुल्ला
म्हसवड 
        दहिवडी म्हसवड रोडवरील लोधावडे पाटी नजिक पवार वस्तीच्या वळणावर क्रेटा व स्विफ्ट डिझायर या दोन कारची जोरदार समोरा समोर धडक होऊन एक जन किरकोळ जखमी झाला तर या भिषण अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून स्विप्ट डिझायर या चार चाकी गाडीचे ड्रायव्हर अपघाता नंतर स्थळापासून पळून गेल्याने अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी पळून गेलेल्या अज्ञात ड्रायव्हरवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.
या बाबत दहिवडी पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती
            शनिवारी दुपारी १२.४५ च्या दरम्यान दहिवडी पोलिस स्टेशन हद्दीतील दहिवडी- म्हसवड रोडवरील लोधावडे पाटी नजिक आसलेल्या पवार वस्तीच्या वळणावर पर्यती ता माण येथील रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षक सुभाष नरळे  हे (सध्या सातारा येथे राहत असून )शनिवार आसल्याने शाळा सुटल्यावर सातारा येथे आपल्या घरी म्हसवड दहिवडी रोडने ह्युंदाई कंपनीची क्रेटा गाडी क्रमांक चक- ४२ इइ ७६०१ हे दहिवडी कडे त्यांच्या बाजुने जात असताना दहिवडीकडून म्हसवडकडे येणारी पांढरे रंगाची स्वीफ्ट डिझायर वाहन क्रमांक चक ४६ -ऊ-१५५४ वरील अज्ञात चालक याने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, भरधाव वेगात   राँग साईडला येवून  गाडीस समोरुन जोरदार धडक दिली.
      अपघात झाल्यानंतर स्वीफ्ट डिझायरचा  ड्रायव्हर  अपघातात मला जखमी करुन मला उपचारास न नेहता अपघात स्थळापासून पळून गेल्याची तक्रार सुभाष नरळे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली असुन अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलिस एस. एन.केंगले  तपास करत आहेत दरम्यान या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या – सुभाष नरळे यांचेवर दहिवडी आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!