पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे दुर्गम भागातील श्रीपालवण गावच्या तरुण शेतकऱ्याला वेळेत उपचार झाल्याने जीवदान मिळाले पोलीस पाटलांचे सर्वत्र कौतुक होत आहे
व्हिजन २४ तास न्युज
BY :पोपट बनसोडे
प्रतिनिधी ; माण
माण तालुक्यातील श्रीपालवन हे अत्यंत दुर्गम भागात डोंगरकपारीवर असलेलं गाव आहे या गावातील तरुण शेतकरी शांताराम शंकर ढेंबरे हे शेतात ज्वारीचे पीक काढत असताना त्यांना सर्पदंश झाला यामुळे ते खूपच भवित झाले होते ही माहिती गावचे पोलीस पाटील वैभव ढेंबरे यांना समजतात त्यांनी रुग्णास तातडीने प्राथमिक उपचारासाठी पुसेगाव येथे नेण्याचा निर्णय घेत या घटनेबाबत खटाव तालुक्यातील फडतरवाडी चे पोलीस पाटील विजय फडतरे यांना याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली. विजय फडतरे यांनीही तात्काळ पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून या घटनेची तात्काळ माहिती दिली असता रुग्ण पुसेगावला पोहोचताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले मात्र रुग्णाची परिस्थिती थोडीशी गंभीर झाल्यानंतर त्यांना पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे 108 या अंमलने हलवण्यात आले सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केल्यामुळे रुग्णास विषारी सर्पदंश होऊन ही जीवदान मिळाले या जीवदाना बद्दल शांताराम ढेंबरे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी दोन्ही पोलीस पाटलांचे आभार मानले आहेत
पोलीस पाटील म्हणून गावामध्ये शासनाचे कान आणि डोळे म्हणून काम करणारा पोलीस पाटील हा गावातील व प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा असतो हेच या घटनेवरून सिद्ध झाले आहे पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य बजावत माणुसकीचे दर्शन घडवल्यामुळे फडतरे व ढेंबरे या पोलीस पाटलांना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.शैलेश देशमुख तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे सपोनि राजकुमार भुजबळ सपोनि सोनवणे पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे माण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड तसेच पोलीस पाटील बंधू भगिनी यांनी दोन्ही पाटलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत