स्थानिक गुन्हे शाखेची धडाके बाज कारवाई मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज 
BY ;सादिक शेख
गोंदवले खुर्द; प्रतिनिधी
समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व . बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयात होत असले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार . . अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्याचे गोपनिय बामतीदारामार्फत बातमी मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा इसम तुपेवाडी ता. खटाव जि. सातारा येथे येणार आहे. त्या अनुषंगाने . अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी तात्काळ
त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस पथक तयार करून त्यांना सदर मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमांस ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.पोलीस पथकाने मिळाले बातमी ठिकाणी रवाना होवून तुपेवाडी ता. खटाव जि. सातारा येथे सापळा लावून
थांबले असता मिळाले बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम तुपेवाडी जिल्हा परिषद शाळाचे दिशेने मोटार सायकल चालवित येताना दिसून आला पोलीस पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला असता सदर इसमाने मोटार सायकलीचा वेग वाढवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकातील पोहवा अमोल माने यांनी त्याचेवर झडप घालून त्यास मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले संशयीत इसमास त्याचे कब्ज्यात असलेल्या
मोटार सायकलीबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल यशवंतराव चव्हाण ब्लड बँक,
सुपरमार्केट शनिवारपेठ, कराड ता. कराड जि. सातारा येथून त्याचा साथिदारासह चोरी केली असलेबाबत कबुली
दिली आहे. संशयीत इसमाने सांगितले हकिकती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील अभिलेख तपासला असता कराड
शहर पोलीस ठाणे गु.र.नं.३३१ / २०२२ भा.द.वि.सं कलम ३७९ प्रमाणे दि. २९/०३/२०२२ रोजी गुन्हा दाखल आहे.चोरी करणारा इसम हा मोटार सायकल चोरी करण्यामध्ये सराईत असून स्थानिक गुन्हे शाखेकडील
पथकाने त्यास विश्वासात घेवूण अधिक चौकशी केली असता त्याने वरील मोटार सायकल शिवाय आणखी तीन
मोटार सायकल त्याचा आणखी एक साथिदारासह चोरी केलेल्या असलेबाबत कबुली दिली आहे. सदर तीन मोटार सायकल पोलीस पथकाने हस्तगत केल्या असून त्यातील एक मोटार सायकलबाबत दहिवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४३३ / २०२० भा.द.वि.स कलम ३७९ व कराड तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.६० / २०२३ भा.द.वि.सं कलम
३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तसेच एका मोटार सायकलबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिले नसल्याने पुढील तपासाकरिता अरोपीस कराड शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. तरी मोटार सायकल चोरी करणाऱ्या संशयीत इसमाचे ताब्यातून खालील प्रमाणे एकूण ८७,०००/-रु किमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास यश आलेले आहे. सदर कारवाई .समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व . बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे . अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे, सफौ तानाजी माने, सुधीर बनकर, पोहवा मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, राजकुमार ननावरे, अमोल माने, अमित झेंडे, मुनिर मुल्ला, पोना अजित कर्णे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, अजय जाधव, पोशि केतन शिंदे, स्वप्निल दौंड, यांनी सहभाग घेताला होता. सदर गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केलेबाबत  समीर शेख,पोलीस अधीक्षक, सातारा . बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!