होटल मालक सुधीर यादव यांचा प्रामाणिकपणा; सोने व मौल्यवान वस्तू असलेली ६ लाख रुपये किमतीची ब्याग प्रवशाला परत
व्हिजन २४तास न्यूज
BY ;सादिक शेख
गोंदवले खुर्द; प्रतिनिधी
भुईज पोलीस ठाणे, जि.सातारा
प्रतिक कृष्णा कंबळकर रा.बालाजी कॉलेज जवळ पुणे हे आज दि.०९/०२/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा नाकोडा ट्रॅव्हल्सने पुणे ते कोल्हापुर असे प्रवास करित असताना सकाळी ०९.३० वा सुमारास सुरुर गावचे हद्दीतील हॉटेल साई पार्क इन येथे नाष्टा करणेसाठी थांबले होते. नाष्टा झालेनंतर ते त्यांचेसोबत
सोने व इतर मौल्यवान वस्तु असलेली बॅग हॉटेल साई पार्क इन येथे विसरुन पुढील प्रवासाकरिता गेले होते.
सदर बॅग कोणीतरी प्रवासी हॉटेल येथे विसरले असलेबाबत हॉटेल कामगार यांचे निदर्शनास आलेने त्यांनी सदर बाब ही हॉटेल मालक सुधीर यादव रा. गुळुंब यांना सांगितली. हॉटेल मालक यांनी नाकोडा ट्रॅव्हल्स
यांचेबरोबर संपर्क साधुन सदर बॅग विसरलेले प्रवासी प्रतिक कृष्णा कंबळकर यांचे मोबाईल वर संपर्क साधुन
त्यांना पोलीस ठाणे बोलावुन घेवुन सदर वस्तु त्यांचेच असलेबाबत खात्री करुन सदर बॅगमधील सोने व इतर
मौल्यवान वस्तु असा अंदाजे ६,००,०००/- रुपये चा मुद्देमाल त्यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बापु बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शीतल जानवे/खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री रमेश
गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी हॉटेल साई पार्क इन चे मालक सुधीर यादव यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भुईंज व भुईंज परिसरातील लोक सुधीर यादव यांनी
केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करित आहेत.