अहिंसा पतसंस्थेकडून विजयनगर शाळेला स्पोर्ट किट ची भेट.
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी
विजयनगर जिल्हा परिषद प्रा. शाळा पर्यंती हि माण तालुक्यातील एक अभिनव उपक्रम राबवणारी शाळा म्हणून सर्व परिचित आहे या अशा उपक्रम शील शाळेतील गोर गरीब मुलांना व्यायाम करण्यासाठी शनिवारी शाळेत अनेक अडचणी येत होत्या त्यापैकी एक प्रमुख अडचण सर्व विद्यार्थी यांना एकसारखा स्पोर्ट ड्रेस नव्हता त्यामुळे व्यायाम करताना अडचणी निर्माण व्हायच्या ही अडचण या शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी जाधव सर यांनी अहिंसा पतसंस्था म्हसवड चे चेअरमन श्री नितिन दोशी साहेब यांना सांगितली व त्यांनी ताबडतोब त्यासाठी साह्य करण्याचे ठरवले, त्या शाळेतील १ ली ते ४ थी च्या एकूण ४० विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा टी शर्ट व ट्रक पॅन्ट असा किट सर्व मुलांना जि प शाळा विजयनगर येथे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात विजयनगर शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य,पालक उपस्थित होते, व अहिंसा पतसंस्था म्हसवड चे चेअरमन नितिन दोशी संचालक महावीर व्होरा, अनिल गाडे , पतसंस्थे चे कर्मचारी उपस्थित होते,आपल्या प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापक श्री बालाजी जाधव सर यांनी मागील ३ वर्षात ९ पट संखेवरून ४० पट झाला ,पालकांचे सहकार्य याबद्दल व शाळेत सुरू असणारे अभिनव उपक्रम याची सविस्तर माहितीच नव्हे तर तत्पुर्वी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी टॅब वर कशा प्रकारे अभ्यास केला जातो, लॅपटॉप, प्रोजेक्टर याच्या मदतीने शिकवण्याचे प्रात्यक्षिण सर्व उपस्थित लोकांना दाखवले, व सोबतच कौशल्य विकसीत मुले साबण बनवतात, घड्याळ बनवतात, खडू,धनुष्य बाण, पियानो वादन, वारली चित्रकला याचे प्रात्यक्षिक पाहून सर्व मान्यवर मंडळी खुश झाले व मा श्री नितिन दोशी यांनी पैसे देऊन मुलांकडून साबण विकत घेतले, कार्यक्रमात आपल्या मनोगतात माजी नगराध्यक्ष नितीन दोशी साहेब म्हणाले की विजयनगरचे पालक व विद्यार्थी खरोखरच भाग्यवान आहेत की त्यांना बालाजी जाधव सारखे शिक्षक लाभले.बालाजी जाधव सर यांनी ही शाळा जागतिक पातळीवर नेहली.आधुनिक तंत्रज्ञानाशी येथील विदयार्थी जोडले गेले.
या शाळेल मदत करण्यास उशीर झाला पण आता यापुढे विजयनगरची शाळा अहिंसा पतसंस्थेने दत्तक घेतली असल्याचेहि नितिन दोशी यांनी सांगीतले