अहिंसा पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महावितरण चे गुणवंत कामगार श्री दिनेश डमकले यांचा गौरव*
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड
आज रोजी अहिंसा पतसंस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली. संस्था यशस्वी 21 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या यशस्वी वाटचाली मध्ये पतसंस्था कर्मचारी, अधिकारी, खातेदार, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे. या शुभ दिनाचे औचित्य साधून महावितरण गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त श्री दिनेश डमकले यांचा गौरव पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला. शाल व श्रीफळ देऊन मा. चेअरमन नितिनभाई दोशी यांचे हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगतात चेअरमन नितिनभाई दोशी म्हणाले, अहिंसा पतसंस्थेच्या गेल्या 20 वर्ष्याच्या वाटचालीस सर्वांनी साथ दिली त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून सेवा करता आली.
पतसंस्थेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. महावितरण चे तांत्रिक कर्मचारी श्री दिनेश डमकले यांना गुणवंत कामगार पुरस्काराने वीज मंडळाने सन्मानित केले याचा म्हसवडकरांना सार्थ अभिमान असून डमकले यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पावती आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री सारंग नवाळे, अमित मुल्ला संस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय धट यांनी केले व आभार श्री नीरज व्होरा यांनी मानले.