31 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मासाळवाडी येथे विविध उपक्रमांनी साजरी :नवनाथ मासाळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड: 
बुधवार दिनांक 31 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मासाळवाडी येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती नवनाथ मासाळ यांनी दिली
     बुधवार दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती विविध उपक्रमांनी  साजरी करण्यात येणार असून सकाळी साडेसात वाजता राजमाता अहिल्यादेवी चे मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे दुपारी चार ते आठ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सायंकाळी चार ते सात वाजता गजी ढोल चा कार्यक्रम होणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री आठ वाजता व्याख्यान ठेवण्यात आले आहेत तसेच शासकीय सेवेत भरती झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत रात्री साडेआठ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री नऊ वाजता राजमाता अहिल्यादेवीची मासाळवाडी येथे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ माजी उपनगराध्यक्ष महादेव मासाळ युवा नेते रामभाऊ मासाळ दादासो मासाळ सचिन मासाळ नवनाथ मासाळ शंकर मासाळ अमोल ठोंबरे डॉक्टर सतीश मासाळ अजित मासाळ नाना मासाळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत घेत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!