बेस्टच्या स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई: (शीतल खर्डेकर )
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) प्रशासनाकडून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरद्वारे वाढलेल्या लाईटबिलांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय त्वरित थांबवण्याची मागणी केली. यापूर्वी लावण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या पद्धतीचे मीटर बसवावेत, अशीही विनंती करण्यात आली.


