व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड विधानसभा निकाल हा शरदचंद्रजी पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे त्यामुळे ते राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा जिल्हा मधील कराड येथे रविवारी मुक्कामी येणार आहेत. राज्यातील विधानसभेच्या निकाल काल लागला या महा निकालात महायुतीने दमदार विजय प्राप्त करत 200 पार जात ऐतिहासिक विजय नोंदवला राष्ट्रवादी चा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्ह्यात यावेळी मात्र राष्ट्रवादीला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही सातारा जिल्ह्या मध्ये राष्ट्रवादी चा महायुतीने सुपडा साफ केला आहे याची खंत शरद पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसत आहे. दरम्यान या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे सातारा जिल्ह्या दौऱ्यावरती येत आहेत यावेळी ते कराडला मुक्कामी येणार आहेत.
दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादीचा झालेला पराभव याचे खापर ते कोणावरती फोडणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर विद्यमान चार आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये कराड दक्षिण विधान सभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, फलटणचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण, कोरेगाव शशिकांत शिंदे, कराड उत्तरचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे उमेदवारांचा झालेला पराभव पक्षाची झालेली पडझड शरदचंद्रजी पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे
सातारा जिल्ह्यात काल लागलेल्या धक्कादायक निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार कराड दौऱ्यावर मुक्कामी येत आहेत. सायंकाळी ते विमानाने विमानतळावर येतील. तेथून ते एका हॉटेलवर मुक्कामी थांबणार आहेत. तेथे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा ते घेणार असण्याची शक्यता आहे. सोमवारी दिनांक 25 रोजी ज्येष्ठ नेते यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रीती संगम वरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी रवाना होतील. समाधीसअभिवादन करून ते तेथील संगीत कार्यक्रमास भेट देणार आहेत. तसेच नंतर ते वेणूताई चव्हाण सभागृहाकडे रवाना होतील तेथे ते यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या बैठकीत उपस्थित राहतील. नंतर तेथील विमानतळावरून ते मुंबईला रवाना होतील.