कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथग्रहणानंतर ना.जयकुमार गोरे यांना भाजपा युवा नेते करणभैय्या पोरे यांनी नागपुरात जाऊन शुभेच्छा दिल्या

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड, प्रतिनिधी:

म्हसवडचे भूषण आणि जनतेचे जलनायक, आमदार मा.श्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या राजकीय वाटचालीत ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. त्यांच्या या यशानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नुकतेच नागपूर येथे विधानभवन परिसरात भाजपा युवा नेते करणभैय्या सुनील पोरे यांनी ना. गोरे यांची भेट घेतली. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथग्रहणानंतर जयकुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी ना. गोरे यांनी करणभैय्या पोरे यांच्या सदिच्छांबद्दल आभार मानले

आमदार जयकुमार गोरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांचा नागपूर येथे शपथविधी झाल्याने म्हसवडसह माणमधील गावोगावी समर्थकांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. आमदार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच म्हसवड येथे ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद उत्सव साजरा केला.

संपूर्ण म्हसवडसह भाजपा कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये या घटनेने अभिमानाची भावना निर्माण झाली असून, पुढील काळात जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवडचा विकास अधिक गतीमान होईल, याबद्दल सर्वत्र विश्वास व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!