डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस ७ तासात शोध घेवुन म्हसवड पोलीसांनी मुसक्या आवळून केले जेरबंद म्हसवड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत मौजे वळई पोस्ट विरळी ता.माण जि.सातारा गावी वळई ते वडजल जाणारे डांबरी रोडलगत गुलाब दशरथ काळेल यांचे पडीक शत जमिनीत फिर्यादीचे मालकीचा जेसीबी कंपनीचा पोकलॅन js205 चे डिझेल टाकीचे लॉक तोडुन १) अक्षय अंकुश तुपे २) अतुल हणमंत यादव ३) सोमनाथ कोंडीबा कर्चे ४) सागर महादेव यादव ५) कुलदिप जगन्नाथ यादव यांनी आपापसात संगणमत करुन १६५ लिटर डिझेल किंमत रुपये १५५१०/- चे फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेहले आहे म्हणुन वगैरे मजकूरची खबरीवरुन म्हसवडा पोलीस ठाणे गु.र.नं.३००/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३७९.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तात्काळ शोध घेवून अवघे ७ तासाचे आत अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेला १०० टक्के हस्तगत करुन तसेच सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त करणेत आल्या असुन सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. भुजबळ व त्यांचे सहका-यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अटक करुन आरोपीकडून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक, सो. श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधि दहिवडी विभाग कॅम्प वडूज मा. अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक राजकुमार भुजवळ, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलिस उप निरीक्षक रवि डोईफोडे पो.ना. जे. डी. लुबाळ ब नं १६७७. पो.ना.ए.पी. नारनवर ब.नं. २९१. पोहवा. एस एन भोसले ब.नं. १४०२, पो. हवा. जाधव ब.नं. २२९. पो. कॉ. एन एच शिरकुळे ब.नं. ६४०, पो. कॉ. ए. पी. वाघमोडे ब नं १४५१. पो. कॉ.ए. जे. भादुले ब नं४२७. म.पो.कॉ. जाधव ब नं २६९४, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.