तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा विरकरवाडी चे उल्लेखनीय यश
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मेघ सिटी म्हसवड येथील क्रीडा संकुलात पार पडल्या. यामध्येधावणे स्पर्धेत संग्राम गणेशखरात-प्रथमक्रमांक,60 मीटर लहानगट ,आदित्य घुटुकडे -द्वितीय क्रमांक 100 मीटर, लहान गट, साहिल जठरे -व्दितीय क्रमांक मोठा गट 100 मीटर तसेच लांब उडी स्पर्धेत कृष्णा विरकर याने मोठया गटात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांचे विरकरवाडी चे सुपुत्र जे एम विरकर,(उपजिल्हाधिकारी मुंबई )माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे साहेब,मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीनदर विरकर यांनी अभिनंदन केले.