श्री भंडारा सेवा विरकरवाडी यांच्या विद्यमाने आयोजित आदर्श जि.प. प्राथमिक शाळा विरकरवाडी येथे तालुकास्तरीय शालेय भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
श्री भंडारा सेवा विरकरवाडी यांच्या विद्यमाने आयोजित आदर्श जि.प. प्राथमिक शाळा* *विरकरवाडी* येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय शालेय भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन माण पंचायत समितीचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी* लक्ष्मण पिसे साहेब *पशुवैद्यकीय अधिकारी*प्राजक्ता भुजबळ मॅडम,मा. *केंद्रप्रमुख* जगन्नाथ विरकर साहेब, यांच्या हस्ते झाले.
इयत्ता १ ली ते ४ थी या लहान गटामध्ये एकूण ९ संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम ३ क्रमांक खालील प्रमाणे.. प्रथम: जि. प. प्राथमिक शाळा*लांबमळा, द्वितीय जि. प. प्राथमिक गोसावीवाडी ( इंजबाव तृतीय: जि.प. प्राथमिक शाळा *अंधरवडवाडी*
तसेच ५ वी ते ८ वी या मोठ्या गटामध्ये १३ संघानी सहभाग नोंदवला. यातील प्रथम तीन क्रमांक
प्रथम: *महात्मा गांधी विद्यालय दहिवडी,द्वितीय जय भवानी विद्यालय पाचवड* ता.खटाव,तृतीय *न्यू इंग्लिश स्कूल दानवलेवाडी* वरील सर्व विजयी संघांना प्रथम क्रमांकासाठी *५०००* रुपये , सन्मान चिन्ह व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी *३०००* /रुपये सन्मानचिन्ह व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकासाठी २०००* /रुपये सन्मान चिन्ह व ट्रॉफी देण्यात येणार आहे.. सदर वितरण उद्या दि.०४/०१/२०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता *सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी साहेब,* अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी *श्री महादेव जी घुले* *साहेब* , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती *अश्विनी शेंडगे मॅडम,* माण तहसीलदार *श्री विकास साहेब,* माण गटशिक्षणाधिकारी *श्री लक्ष्मण पिसे साहेब* या सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. लहान व मोठ्या गटाच्या प्रश्न निर्मितीसाठी *श्री रूपचंद बोराटे सर* यांनी अथक मेहनत घेतली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री विशाल विरकर, श्री श्रीधर विरकर, श्री सचिन विरकर सर, श्री संतराम पवार सर, श्री किरण बोराटे सर या सर्वांनी तसेच श्री भंडारा सेवा कार्यकर्ते यांनी घेतली.
कठपुतली बाहुल्यांचा खेळ श्री संतराम पवार सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केला. तसेच जि.प. प्राथमिक शाळा लोधवडेच्या स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी उत्कृष्ट पद्धतीने वेगवेगळ्या क्लॅप देऊन सर्वांचे अभिनंदन केले.