झाडाणी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार सुशांत मोरे यांच्या बेमुदत उपोषणास यश ; विविध मागण्याही मान्य
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा/प्रतिनिधी
सह्याद्री वाचवा मोहीमेतंर्गत माहिती अधिकार कायद्यातंर्गत मिळालेल्या माहितीनुसार झाडाणी येथील ६४० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावली होती. तसेच याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले होते. परिणामी कमाल जमीन धारणाप्रकरणी सुनावणी सुरु असली तरी झाडाणी येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.

दरम्यान श्री. मोरे यांच्या झाडाणीप्रकरणी लढ्यास मोठे यश मिळाले असून निवास उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना झाडाणी येथील अनधिकृत बांधकामावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४५ अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच श्री. मोरे यांच्या विविध मागण्या मान्य झाल्याने श्री. मोरे यांनी बुधवारी उपोषण स्थगित केले.


