व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द,चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन भाई दोशी यांनी काढले. नुकत्याच झालेल्या JEE (Main), CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ अहिंसा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आला. JEE (Main) परीक्षेत कु.प्राजक्ता बाळासाहेब कलढोणे या विद्यार्थिनीने 98.06% मार्क्स मिळवले, तसेंच कु. विशाखा अमोल माने या विद्यार्थिनीने CET परीक्षेमध्ये 99.04% मार्क्स मिळवले. JEE (Main) ही परीक्षा ही देशपातळीवरील सर्वात कठीण परीक्षे मधील 3 नंबरची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये 98% गुण मिळवने हे नक्कीच माण तालुक्या साठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे CET परीक्षा ही देखील राज्य पातळीवरील सर्वोच्च परीक्षा आहे अशा परीक्षेमध्ये 99% गुण मिळवणे हे देखील अभिमनस्पद आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी ऍड. हांगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एखाद्याच चांगल झालेल हल्ली लोकांना बघवत नाही, अशा मध्ये एखाद्याच्या आनंदात आपला आनंद मानने, त्यांचा गौरव करणे हा गुण जवळ जवळ लोप पावत चालला आहे परंतु दोशी साहेब यापैकी एक आहेत जे लोकांच्या आनंदात आपला आनंद शोधतात,
आपल्या मनोगतात बोलताना जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले की, कलढोणे आणि माने या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश नक्कीच वाखानण्याजोगे आहेच परंतु नितिन भाईंसारखी लोक सुद्धा आहेत जे निरनिराळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवतात अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतात. अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संचालक श्री लुनेश विरकर सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , विद्यार्थ्याबाबत पालकांनी जागरूक असलं पाहिजे कु.कलढोणे व माने यांनी मिळवलेलं यश हे एका दिवसाचं नसून त्यासाठी खूप परिश्रम घ्यावं लागत. त्यासाठी पालकांनी दिशा ठरवली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात सुनील शिंदे, बाळासाहेब कलढोणे यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना श्री बाळासाहेब कलढोणे म्हणाले की, माझ्या कन्येचा इयत्ता 5 वी मध्ये नवोदय परीक्षा व स्कॉलरशिप मध्ये नंबर लागल्यानंतर पहिला सत्कार नितिन भाई दोशी यांनी घेतला होता व त्यावेळी ये बोलले होते की यापेक्षाही मोठा सत्कार घेण्याची संधी द्यावी , तिच जिद्द मनात ठेवून माझ्या कन्येन मनात जिद्द ठेवली आणी आज हे यश संपादन केले. हे संपूर्ण यशाच श्रेय नितिन भाई ना जात असेही ते बोलले आणी बोलता बोलता भावुक झाले त्यांना अश्रू अनावर झाले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक अजित मासाळ, रोहित लिंगे, श्री काळे,नितिन कलढोणे सौ.सुजाता माने, सौ.कलढोणे व म्हसवड नगरीचे सुजाण नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले. आभार मनोज शिंदे यांनी मानले.