गोळीबार करून दहशत माजविणारे आरोपी जेरबंद

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी: श्रीकांत जाधव

उंब्रज (ता. कराड) –
चरेगाव येथे ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्यातील वाद जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, सुदैवाने अनर्थ टळला. या घटनेत हवेत गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या आरोपींना उंब्रज पोलिसांनी अटक करून ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.

चरेगाव येथे ट्रॅक्टर ड्रायव्हर पाखऱ्या आणि ऊसतोड कामगार यांच्यातील वाद विकोपास गेला. या भांडणाचा राग धरून आरोपी सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी, मकरंद गुलाब सूर्यवंशी, पुंजाराम सुखदेव पाखरे आणि राज अंकुश आवळे हे स्कुटी, बुलेट आणि मोटारसायकलवर घटनास्थळी आले.

गोळीबार आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न
सोन्या सूर्यवंशी याने सिंगल बोर बंदुकीतून फिर्यादीवर थेट गोळी झाडली. मात्र, फिर्यादीने सतर्कता दाखवत बंदुकीचा बॅरल बाजूला केल्याने तो राऊंड त्यांच्या कानाजवळून गेला. त्यानंतर मकरंद सूर्यवंशी आणि पुंजाराम पाखरे यांनी ऊसतोड कामगार मुकेश पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी ऋषिकेश सूर्यवंशी याने हवेत चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि “तुला आज जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.

घटनेनंतर उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी भवानवाडी, खालकरवाडी, आणि चरेगाव भागात पेट्रोलिंग सुरू केले. अखेर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!