अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी चार दिवस पोलीस कस्टडीत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी

म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला माननीय सत्र न्यायालय, वडूज यांनी चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनगरवाडी (ता. माण) येथील नितीन धनाजी ढेरे याने अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीचे आमिष दाखवून, धमकावून व जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारामुळे संबंधित मुलगी गरोदर राहून तिने अलीकडेच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक बाब तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह तपास पथकाने आरोपीला 24 ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

आज (25 ऑगस्ट) रोजी आरोपीला माननीय सत्र न्यायालय, वडूज येथे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ए. ए. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *