राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर – फडणवीसांकडे गृहखाते, अजित पवारांकडे अर्थ, शिंदेंकडे नगरविकास!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
मुंबई –

राज्यातील राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली. यामध्ये काही चर्चित नावांना महत्त्वाची खाती देण्यात आली असून, महायुती सरकारच्या कार्यप्रणालीचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपेक्षेनुसार गृहखाते राखण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माण यांसारखी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत.

खाते वाटप
1 देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक – वनमंत्री
11) दादा भुसे – शालेय शिक्षण
12) संजय राठोड – जलसंधारण
13) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
15) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
19) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
22) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23) अदिती तटकरे – महिला व बालविकास
24) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
25) माणिकराव कोकाटे – कृषी
26) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
27) नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
28) संजय सावकारे – कापड
29) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
30) प्रताप सरनाईक – वाहतूक
31) भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
32) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
33) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
34) आकाश फुंडकर – कामगार
35) बाबासाहेब पाटील – सहकार
36) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers)

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व
औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण.

सातारा जिल्ह्यात चार मंत्रिपद 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!