व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (दिलीपराज कीर्तने) म्हसवडनगरीतील श्री.सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या पारंपारिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.या निमित्त भाऊ बिजेस काल सायंकाळी चार वाजता सुरु झालेली फटाक्याच्या आतषबाजीतील दिवाळी मैदान मिरवणूक आज दुपारी एक नंतर प्रथमच उशीरा मंदीरात पोहोचली.
या देवस्थानच्या इतिहासातील या दिवाळी मैदान मिरवणूक 21 तासांहून अधिक कालावधीची संपन्न झाल्याची नोंद झाली आहे. या पुर्वी हि मिरवणुक भाऊबिजेस सायंकाळी चार ते रात्री बारा नंतर मंदीरात विसर्जित होत असे. यंदाच्या या शाही विवाह सोहळ्यातील राज्यात लक्षवेधी असलेली ही दिवाळी मैदान महाआरती मिरवणुक येथील व परगावच्या भाविकांनी विक्रमी संख्येने फटाक्याची आतषबाजी करीत कोठ्यावधी रुपये लाखो रुपये खर्ची करुन विक्रम केला असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. यामुळे या श्रींच्या शाही विवाह सोहळ्याचे दोन दिवस सुरु राहिलेले हे दिवाळी मैदान इतिहासात नोंद झाले आहे.