पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभयसिंह जगताप यांचा समाजसेवा व शेती प्रगतीचा भव्य दुहेरी उपक्रम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादकअहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या पुढाकारातून माण–खटाव तालुक्यात दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या भव्य रक्तदान शिबिरासाठी म्हसवड व वडूज येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गलांडे हॉस्पिटल शेजारील अभय दादा जनसंपर्क कार्यालय (म्हसवड) आणि निरामय हॉस्पिटल (वडूज) येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत रक्तदानाची संधी उपलब्ध राहणार आहे. रक्तदात्यांसाठी आकर्षक भेटवस्तूची व्यवस्था असल्याने युवक वर्गामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

तसेच १३ डिसेंबर रोजी माण–खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुणे येथे होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाच्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, खतांचे नवे पर्याय ते स्मार्ट शेती उपाय—शेतकऱ्यांना थेट अनुभव घेण्याची ही अनोखी संधी ठरणार आहे. म्हसवड, दहिवडी आणि वडूज येथून सकाळी ६:३० वाजता बस सुटणार असून, शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

या दुहेरी उपक्रमांच्या आयोजनाचे श्रेय अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाला जात असून, त्यांनी समाजसेवा व शेतीसाठीचा हा विशेष उपक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राबवला आहे.

नोंदणी व संपर्क:
म्हसवड – शुभम फुटाणे : 7776090096
दहिवडी – अक्षय चव्हाण : 7447895591
वडूज – प्रज्वल गोफणे : 8308438257


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *