अभय सिंह जगताप युवा मंच व रॉयल स्पोर्ट्स सांगोला तर्फे भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
शरद महोत्सव अंतर्गत राष्ट्रवादी चषक २०२४ ही स्पर्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप व रॉयल स्पोर्ट्स सांगोला यांच्या विद्यमानाने माढा मतदारसंघातील करमाळा टेंभुर्णी नंतर प्रथमच सांगोल्यात ही या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी चषक 2024 स्पर्धा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत..
