अभय मेनकुदळे यांचा अपघाती मृत्यू : *एक अभ्यासू नेतृत्व हरपलं…
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
स्व. सदाशिवराव पोळ यांच्यासह त्यांचे पुत्र मनोजदादा पोळ, डॉ. संदीप पोळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, शेखरभाऊ गोरे यासह अनेक राजकीय नेत्यांशी अतिशय निकटचे संबंध असणारे राजकारणातील व प्रशासनातील अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणजे शिंगणापूरचे *अभय मेनकुदळे…*
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच मेनकुदळे यांनी हॉलीबॉल मध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केलं. त्यांनंतर माणचे आमदार तुकाराम तुपे, खटावचे विधानपरिषदेचे आमदार प्रभाकर घार्गे यांचे स्वीय सहायक म्हणून मेनकुदळे यांनी सलग 15 वर्षे काम पाहिले. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानभवन येथील प्रत्येक विभागाची माहिती त्यांना झाली होती. 2015 ते 2020 या कालावधीत शिंगणापूरच्या सरपंच पदावर ते कार्यरत होते.
रविवारी 22 ऑक्टोबर रोजी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या बैठकीसाठी ते निघाले होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माण तालुकाध्यक्ष पदासाठी त्यांची नियुक्ती निश्चित झाली होती. मात्र काळाच्या पोटात काही वेगळंच दडलं होतं. सातारला जातानाच कोरेगाव नजीक पाठीमागून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामध्ये अभय मेनकुदळे यांचा जागीच मृत्यू झाला….
*एक अभ्यासू नेतृत्व हरपलं.