व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते कराड: प्रतिनिधी
कराड तालुक्यातील मसूर परिसर व करवडी परिसर कॅनॉलच्या ओलीताखाली येणारे क्षेत्र वीस हजार हेक्टर सध्या पाण्याअभावी कोरफळून जात आहे लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही अन्यथा कराड तालुक्यामधील मसूर भागातील काही गावांना दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे आरफळ कालव्याच्या पाण्याची योग्य नियोजन करावे व शेतकऱ्यांची पिके व पिण्यासाठी पाणी नियोजनबद्ध द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे
अन्यथा जनआंदोलन उभं करणार आहे अशी माहिती शेतकरी वर्गाकडून सध्या दिली जात आहे आत्ता राज्यामध्ये धरणामध्ये 50 टक्के पेक्षा कमी साठा असल्यामुळे राज्यामध्ये पाणी नियोजन करणे कठीण आहे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या दबाव आणून पाणी वाटपासाठी दबाव टाकत आहेत अशा परिस्थितीमध्ये पाणी वाटपाचा मुद्दा राजकीय डोकेदुखी होऊ शकतो पाण्याचे योग्य नियोजन करावे अन्यथा सातारा जिल्ह्यातील व सांगलीतील पाण्याचा प्रश्न गंभीर होईल मानवनिर्मित संकटांना भविष्यात सामोरे जावे लागेल
कृष्णा नदी बचाव चवळीतील सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार म्हणाले की राज्यांमधील पाणी वाटपाचा मुद्दा आता तालुक्यामध्ये गाजत आहे निसर्गाचा समतोल ढासळत आहे त्यामुळे नैसर्गिक जलाशय अस्तित्व धोक्यात आले आहे त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन योग्य करावे अन्यथा पाण्यासाठी अनेक गावांमध्ये भविष्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि पर्यावरण दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी करत आहेत.