म्हसवड इंजबाव रोडवर म्हसोबा मंदिराजवळ कार चा अपघात होऊन इंजबाव येथील तरुण ठार 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड 
     म्हसवड- इंजबाव रोडवर  म्हसवड पासून २किमी  अंतरावर असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ चारचाकी कारचा अपघात होऊन बापूसाहेब तुकाराम कापसे वय २७ वर्ष रा. इंजबाव हा जागेवच मयत झाल्याची फिर्याद बाळू बाबा कापसे वय ७० रा .इंजबाव यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे 
चार दिवसापूर्वी दिपवाली साठी आपल्या इंजबाव या गावी आला असताना बुधवार दि ८ रोजी रात्री साडे अकरा वाजता आई वडिलांना म्हणाला मी आर्धा तासात म्हसवडला जावून येतो म्हणून स्वताच्या   शेवरलेट  कार क्र MH14CS2725 ही  या चार चाकी गाडीने म्हसवड इंजबाव रस्त्याने म्हसवडला येत असताना म्हसोबा मंदिरा नजिक बापूसाहेब यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीने दोन तिन पलटी खावून रस्त्यापासून शंभर फुट बाजूला गेल्याने अपघात होऊन बापूसाहेब कापसे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि ९ रोजी सकाळी उघड झाली बापूसाहेब यांच्या आकस्मित अपघाती मृत्यूने इंजबाव गावात हळहळ व्यक्त होत आहे
 
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी
  इंजबाव येथील   तुकाराम कापसे  यांचा बापूसाहेब कापसे हा एकुलता एकच मुलगा आहे दोघेही कामानिमित्त मुबंईला राहणेस आहे  बापूसाहेब कापसे  हा गेले चार दिवसापूर्वीच गावी इंजबाव येथे आपली शेवरलेट  कार क्र MH14CS2725 ही घेऊन आला होता
बुधवार दि ८ रोजी रात्री ११   वाजण्याच्या दरम्यान म्हसवड गावच्या हद्दीत   इंजबाव ते म्हसवड जाणाऱ्या डांबरी रोडवर म्हसोबा मंदिराजवळ बापूसाहेब कापसे वय २७ रा इंजबाव ता माण  हा त्याची कार क्र MH14CS2725 मधून म्हसवडला येत असताना त्याची कार रस्त्यावरुन खाली नाल्यात जाऊन धडकुन लांबवर जाऊन अपघात होऊन या अपघातात माझा पुतण्या बापूसाहेब कापसे हा  जागीच मयत झाला असल्याची फिर्याद  चुलते बाळू बाबा कापसे वय ७० रा .इंजबाव यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात  दिली असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!