व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड – सुयोग मच्छिंद्र शिर्के वय 28 वर्ष राहणार भाटकी येथील युवकाने म्हसवड मधील एका नवीन इमारतीचे काम सुरु असलेल्या बंगल्यातील जिन्याच्या लोखंडी अँगलला वायर बांधून वायरने गळफास घेतल्याची दुदैवी घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याबाबतची खबर मयताच्या चुलत भाऊ अजित गोरख शिर्के रा.भाटकी ता. माण यांनी दिली असूनम्हसवड हद्दीतील टॉम मार्टिन पथूपरंबिल यांचे नवीन बांधकाम झालेल्या घरामध्ये जिन्याच्या लोखंडी अँगलला वायर बांधून वायरने माझा चुलत भाऊ सुयोग मच्छिंद्र शिर्के वय 28 वर्ष राहणार भाटकी तालुका माण जिल्हा सातारा हा गळफास घेऊन मयत झालेला आहे तरी सदर मयताचा तपास व्हावा . या घटनेचा तपास सपोनि सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस हवालदार जाधव करीत आहेत