दहिवडी परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

दहिवडी, ता. माण : प्रतिनिधी

माण तालुक्यातील दहिवडी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९ मार्च) रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश विजय काशीद (वय ३६, रा. दहिवडी शिंदेमळा, ता. माण, जि. सातारा) यांनी पिंगळे बुद्रुक हद्दीत सूर्यकांत प्रल्हाद जगदाळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. ही घटना सोमवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती प्रशांत शंकर काशीद (वय ३२, रा. दहिवडी शिंदेमळा) यांनी दहिवडी पोलिसांना दिली. त्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ११/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वावरे करीत असल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.

या दुर्दैवी घटनेमुळे दहिवडी परिसरात शोककळा पसरली असून नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *